आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वरती मिळणार तीन लाख रुपये कर्ज | Kisan Credit Card Loan Information |

आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वरती मिळणार तीन लाख रुपये कर्ज | Kisan Credit Card Loan Information |

 

 

 किसान क्रेडिट कार्ड फायदे

शेतकऱ्यांना शेती व शेतीशी संबंधित कामासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं आदी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. या योजने अंतर्गत शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. तसेच या कर्जावरील व्याजदर खूपच कमी असतो.

काय आहे हे किसान क्रेडिट कार्ड :-

साधारणपणे, असंघटित क्षेत्राकडून घेतलेल्या रकमेवर जास्त व्याज मिळते. या अवैध दबावातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत विशेष क्रेडिट कार्ड शेतकऱ्याला सरासरी 4 टक्के व्याजदराने रक्कम कर्ज घेण्याची परवानगी मिळते. काही शेतकर्‍यांना दर 2 टक्के इतका कमी असू शकतो. एवढेच नाही तर किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाचा परतफेड कालावधी लवचिक असतो कारण तो कापणीनंतर सुरू होऊ शकतो.

आपण किसान क्रेडिट कार्डचे फायदे बघू :-

प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कार्ड घेण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

१. प्रधानमंत्री किसान कर्जाची रक्कम बँकांनुसार बदलते आणि काही परिस्थितींमध्ये ती ₹ 3 लाखांपर्यंत असू शकते.

२. प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डची  कर्ज परतफेड प्रक्रिया सोयीस्कर आहे आणि कापणीनंतर ती  केली जाऊ शकते.

३. शेतकरी, किसान कर्ज योजनेचा कृषी आणि इतर संलग्न कामांमध्ये लाभ घेऊ शकतात.

४. किसान क्रेडिट कर्जाची वितरण प्रक्रिया अतिशय सोपी आणि जलद आहे.

५. प्रधानमंत्री किसान कर्ज योजनेंतर्गत, खते आणि बियाणे इत्यादी खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा शेतकर्‍यांना मदत तसेच सवलत मिळते.

६. व्याज दर, जो सरासरी ४ टक्के आहे, प्रत्येक बँकेनुसार बदलतो आणि किसान क्रेडिट कार्ड नुसार २ टक्के इतका कमी असू शकतो.

७. किसान क्रेडिट कार्ड कर्जाची रक्कम ₹ १.६० पेक्षा कमी असल्यास बहुतेक बँकांना तारणाची आवश्यकता नसते.

८. किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जावरील व्याज सवलत, परतफेडीचा इतिहास आणि क्रेडिट इतिहासावर अवलंबून केली जाऊ शकते.

९. प्रधान मंत्री किसान क्रेडिट कार्ड हे  ₹५०००० पर्यंतचे कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू विरुद्ध विमा संरक्षण प्रदान करते.

१०. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत इतर जोखमींसाठी ₹२५,००० चे विमा संरक्षण दिले जाते.

किसान क्रेडिट कार्ड योजना ऑगस्ट 1998 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सुरू केली होती. यामुळे शेतकर्‍यांना कर्ज मिळत आहे, त्यावरील व्याजदर कमी आहे, त्यामुळे शेतकरी सहजपणे कर्ज घेऊ शकतो, ते ही सरकारकडून आहे, म्हणूनच किसान क्रेडिट कार्ड सुविधा ही सर्वोत्तम सुविधा आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याला ५0,000  ते ३00000 लाखापर्यंत कर्ज देण्यात येते. ज्याचा व्याज दर सहा महिन्यांसाठी ४% आणि एक वर्षासाठी ७% आहे, जो शेतकऱ्यांसाठी खूप चांगला आहे. पीक नष्ट झाल्यावर त्यांना नुकसान भरपाई देखील दिली जाते, तसेच पूर आल्यास पिकाचा नाश होणे किंवा दुष्काळामुळे पीक जळून जाणे इत्यादी सुविधांमध्ये हे किसान क्रेडिट कार्ड अतिशय उपयुक्त आहे, ज्याचा शेतकरी लाभ घेऊ शकतो.

 

क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, किसान क्रेडिट कार्ड धारकाला वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देखील प्रदान केले जाते. जे असे आहे –

• क्रेडिट कार्ड धारकाला त्याच्या मृत्यू पश्चात र ₹ ५0,000/- इतके विमा संरक्षण दिले जाते.

• क्रेडिट कार्ड धारकाला त्याच्या अपंगत्वावर ₹२५,000/- इतके विमा संरक्षण दिले जाते.

• या योजनेंतर्गत 70 वर्षांपर्यंत संरक्षण दिले जाते.

क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत खालील सेवा पुरविल्या जातात :-

• पीक लागवडीसाठी आवश्यक असलेल्या अल्प मुदतीच्या कर्जाची पूर्तता क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पुरविली जाते.

• काढणीनंतरचा खर्च आणि उत्पादन विपणन कर्जासाठी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत दिली जाते.

• शेतकऱ्यांच्या उपभोगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत दिली जाते.

• दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय इ. शेतीशी निगडीत शेती उपकरणे आणि इतर मालमत्ता आणि इतर क्रियाकलापांच्या देखभालीसाठी आवश्यक खेळते भांडवल पूर्ण करणे हे क्रेडिट कार्ड चा मुख्य उद्देश आहे.

 

किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत पात्रता :-

• अर्जदाराची स्वतःच्या मालकीची शेतजमीन हवी.

• शेतकऱ्याचे वय १८  ते ७५ वर्ष या दरम्यान असावे.

• ज्या बँकेत किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला आहे. त्या बँकेच्या नजीकच्या परिसरात अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण असावे.

• मत्स्यपालन करणाऱ्यांकडे मत्स्यपालनाशी संबंधित घटकांची तलाव, बोट इत्यादी निगडित वस्तुंची मालकी असणे गरजेचे आहे.

• मासेमारी व्यवसायिकांकडे स्वतःच्या मालकीची बोट, समुद्रात मासेमारी करण्याचा परवाना आदी गोष्टींची गरज आहे.

• पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीच्या शेळ्या, मेंढ्या व इतर संबंधित गोष्टींची मालकी असावी.

किसान क्रेडिट कार्डसाठी असा अर्ज करा

भारतातील अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सगळ्या लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्याची मोहीम हाती घेतली.

 

पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाईटवर किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला दिला. हा अर्ज कसा भरायचा ते आपण पाहुया. हा फॉर्म 8 भागांमध्ये विभागला आहे.

‘अ” भागातील माहिती बॅंकेचे अधिकारी भारतात.

ब- भागात तुम्हाला कार्ड नवीन आहे की, जुन्या कार्डची मर्यादा वाढवायची आहे का? किंवा बंद पडलेलं कार्ड पुन्हा सुरू करायचे आहे का? त्याची माहिती द्यावी लागते.

 

क-  भागात तुमची स्वत:ची आणि बॅंक खात्याची माहिती द्यायची आहे. तसेच तुम्हाला पंतप्रधान सुरक्षा बिमी योजना आणि पंतप्रधना जीवन ज्योती बिमा योजने अंतर्गत विमा घ्यायचा असेल तर “हो” या पर्यायावर टीकमार्क करा. पण यासाठी दरवर्षी तुम्हाला ३४२ रूपयांचा हप्ता भरावा लागेल आणि त्या बदल्यात तुम्हाला २ लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळेल.

 

पुढील ड- भागात जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर त्याची सर्व माहिती द्यावी लागेल  अशी माहिती या भगत आहे.

त्यानंतर इ- भागात शेतजमिनीबद्दलची माहिती द्यायची आहे. जसे की, तुमच्याकडे किती जमीन आहे. त्यातील खरीप आणि रब्बी किती? कोणती पिके घेता इत्यादी.

 

फ-  भागात मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी माहिती भरायची आहे. त्यात दूध देणाऱ्या प्राण्यांची संख्या, प्राण्यांचे प्रकार, डुकर तसेच कोंबड्या किती इत्यादी. मत्सपालन कुठे करता समुद्रात की मत्स्यपालनाद्वारे याची माहिती द्यायची आहे.

 

त्यानंतर डिक्लेरेशनद्वारे भरलेल्या माहितीची सत्यता करण्यासाठी सही करून अर्जासोबत सातबारा उतारा, 8-अ, बॅंकेतून कर्ज घेतले असेल तर त्याचे स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 3 पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे बॅंकेकडे जमा करायची आहेत.

सरकारनं गेल्या दोन वर्षांत विशेष मोहीम राबवून 3  कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले आहेत. किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यकतेनुसार कर्ज सहज मिळू शकते. शेतकऱ्यांना ते कमी व्याजासह सोप्या पद्धतीनं परत करण्याची सुविधा आहे.

५ वर्षे वैधता-

किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्षे आहे. 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता हमीशिवाय उपलब्ध आहे. यापूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये होती. अधिसूचित पिके / अधिसूचित क्षेत्रे सर्व किसान क्रेडिट कार्ड  कर्जावर पीक विम्याच्या अंतर्गत समाविष्ट आहेत.

ओळखपत्राच्या पुराव्यासाठी कागदपत्रे:

किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे मतदार ओळखपत्र असावे.

किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे पासपोर्ट असेल तरी त्याची ओळख यानुसार पटविली जाऊ शकते. किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे आधार कार्ड असले पाहिजे.

किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स इ. कागदपत्रं आवश्यक आहेत.

पत्त्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रे:

किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे स्वतःच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र दाखविणे गरजेचे आहे.

किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे स्वतःच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी पासपोर्ट असला तरी चालू शकते.

किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे स्वतःच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

किसान क्रेडिट कार्ड धारकाकडे स्वतःच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स इ. कागदपत्रं आवश्यक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *