शरद पवार ग्राम समृद्धी पशु योजना | Sharad Pawar Gram Samruddhi Pashu Yojana |
शरद पवार ग्राम समृध्दी योजना
सर्व शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची असाही ही बातमी आहे. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेंतर्गत गाई तसेच म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यास महाराष्ट्र सरकार नागरिकांना अनुदान उपलब्ध करून देत आहे, तसेच शेळ्या व मेंढ्यांसाठी शेडही बांधण्यास सुद्धा मदत केली जात आहे. या योजनेंतर्गत कुक्कुट पालन तसेच पोल्ट्री शेड बांधण्यासाठी सुद्धा राज्य सरकार मदत देईल. ज्या शेतकर्यांकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जनावरे आहेत ते सुद्धा शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेंतर्गत २०२१ च्या सेवेसाठी पात्र आहेत. या साठीचा शासन निर्णय शासनाने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतलेला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येते.
असे मिळणार अनुदान
• गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम :
या अनुदांनामध्ये दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी ७७,१८८ रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट, १८ पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.
• शेळीपालन शेड बांधकाम :
१० शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी ४९,२८४ रुपये अनुदान दिले जाणार आहे. २० शेळ्यांसाठी दुप्पट म्हणजे एक लाखाच्या आसपास, तर ३० शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
• कुक्कुटपालन शेड बांधकाम :
१०० पक्ष्यांकरिता शेड बांधायची असेल तर ४९,७६० रुपये अनुदान दिले जाणार आहे. १५० पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे १०० पेक्षा कमी पक्षी असल्यास १०० रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० पक्षी आणणे बंधनकारक राहील.
• भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग :
शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १०,५३७ रुपये अनुदान दिले जाणार आहे.
केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. हे उद्दिष्टे लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे शेतकर्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामधील एक म्हणजे शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार…
• सुरवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा.
• त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.
• त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाका.
• आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करा.
• येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा.
• इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
• त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्य्र रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करा.
• तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा.
• लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.
• रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.
• अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.
• शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.
• यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.
• यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल.
• त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल.
• एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. कारण त्यांच्या जन्म दिवसाच्या दिवशी म्हणजे १२ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र सरकार ने सुरू केली. या योजनेचे नाव शरद पवारांनी त्यांच्या जन्मतारखेचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या माध्यमातून खेड्यांचा आणि शेतकर्यांचा विकास होईल आणि त्यांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेचे नाव श्री शरद पवार साहेब यांच्या नावावर ठेवण्यासाठी महा विकास आघाडीने सुचविले होते. मंत्रालयाने या योजनेस मान्यता दिली आहे. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजने ला मनरेगा सोबत जोडण्यात आले आहे.
शरद पवार ग्राम समृध्दी योजना २०२१ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर राबविली जाईल. मनरेगा अंतर्गत देण्यात येणार्या रोजगाराला शरद पवार ग्रामीण समृध्दी योजनेशीही जोडले जाईल. ही योजना रोजगार हमी विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांची व खेड्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.
तुम्हाला जर शरद पवार ग्रामीण समृद्धि योजना २०२१ चा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे तुमच्या कडे असणे अनिवार्य आहे.
• अर्जदार हा महाराष्ट्रचा कायमचा रहिवासी असावा.
• अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा असावा तसेच त्याचा व्यवसाय हा शेती असावा.
• अर्जदाराचे आधार कार्ड.
• अर्जदाराचे रेशन कार्ड.
• रहिवासी दाखला.
• पासपोर्ट आकाराचा फोटो.
• सूस्थितीत असलेला मोबाइल क्रमांक.
• उत्पन्नाचा दाखला.
शरद पवार ग्रामीण समृद्धि योजना २०२१ ऑनलाइन अर्ज करू शकता.
तुम्हाला जर शरद पवार ग्राम समृद्धि योजना २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही दिवस वाट बघवी लागेल कारण राज्य सरकार कडून शरद पवार ग्रामीण समृद्धि योजना २०२१ ऑनलाइन अर्ज विषयी अजून कोणतीही अपडेट आली नाही. जेव्हा पण सरकार काही अपडेट जाहीर करेल तेव्हा आपल्याला तुम्हाला या पोस्टा च्या माध्यमातून अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर सांगितली जाईल.
शरद पवार ग्रामीण समृद्धि योजना पात्रता :-
महारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या विविध वैयक्तिक ( कामाचा प्रकार – फलबाग, वृक्षा लागवड, शेतं तळे ) व सार्वजनिक उदा. कामाचा प्रकार रस्ता/ ओढा/नाला/ पाझर/तलाव, गाळ काढणे.ग्राम पंचायत क्षेत्रावर वृक्ष लागवड, संगोपन ई. कामाच्या संयोजनतून कुशल अकुशल प्रमाण ६०:४० लाभार्थी पातळीवर राखण्यासाठी योजनेअंतर्गत काम केलेले असावे. याबाबत ग्रामसेवक/ कृषी सहाय्य्क/ यंत्रणा अधिकारी यांचा कामबाबतचा शिफारस दाखला जोडावा.
सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर किमान २० ते ५० फळझाडे/ वृक्ष लागवड करण्यात येऊन, त्याचे तीन वर्षे संगोपन करून झाडे १००% जीवंत ठेऊन योजनेचा लाभ पूर्ण घेणारे लाभार्थी किंवा चालू वर्षामध्ये ग्राम पंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान १०० दिवस पूर्ण करणे आवश्यक आहे. वैयक्तिक क्षेत्रावर २० ते ५० फळझाडे/ वृक्ष लागवड केल्यास गाय गोठा (छता विरहीत) कामाचा आढावा लाभाकरीता पात्र असेल.