100 रुपयांत
दिवाळसणाचा किराणा! सरकारकडून रेशनकार्ड धारकांना खुशखबर.
महागाईच्या काळातही यंदाची दिवाळी स्वस्त होणार आहे. तुम्ही ही बातमी ऐकली आहे का? की महाराष्ट्र सरकार ह्या वर्षी दिवाळीत अवघ्या शंभर रुपयात फराळासाठी लागणारे चार जिन्नस देत आहे. राज्यातील रेशनकार्ड धारकांना महाराष्ट्र सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. सरकारने मंगळवारी सांगितलं की ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहेत त्यांना दिवाळीसाठी 100 रुपयांचं किराणा सामान दिलं जाईल, ज्याच्या मदतीने ते यंदाच्या मिठाई आणि फराळ बनवू शकतील.
राज्यातील जनता कोरोना काळानंतर आता हळूहळू सावरत आहे. श्रावण सण गेले गणेशोत्सव गेला नवरात्री देखील गेली आणि आता तोंडावर सणांची राणी म्हणजेच दिवाळी येऊन ठेपली आहे.. मात्र कोरोना नंतर सावरत असलेली सामान्य जनता महागाईमुळे फराळ कसा बनवायचा ह्याच
विवंचनेत आहे. मात्र दिवाळी साजरी करावी असं प्रत्येकालाच वाटतं.
म्हणूनच सरकारच्या ह्या पावलामुळे गरिबांच्या घरातही दिवाळी साजरी होईल. अवघ्या 100 रुपयांत मिळणार किराणा आहे सामान. एक किलो रवा, साखर, खाद्यतेल आणि चणा डाळ 100 रुपयांच्या पाकिटात असेल. आज आहे सरकारकडून सर्व प्रजेला दीपावली बोनस.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी मंत्रालयाला या संदर्भात सूचना दिल्या आहेत. की या किराणाचं वितरण दिवाळी आधीच होईल. यामध्ये नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये कुठलीही तक्रारी होऊ नये अशी सक्त ताकीद सुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
काय आहे सरकारची योजना
100 रुपयांच्या रेशनमध्ये रवा, खाद्यतेल, साखर आणि चणा डाळ असेल.
सरकारच्या म्हणण्यानुसार राज्यातील 7 कोटी लोकांकडे शिधापत्रिका आहेत. अलीकडेच महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर्ससाठी रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. त्याबाबत आपण माहिती घेऊया. म्हणजेच सरकारचा सर्वसमावेशक दृष्टिकोन या उपक्रमातून आपल्याला दिसतो. आता सर्वांच्या घरात दिवाळी साजरी होईल.
रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांचा किराणा माल देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. या शंभर रुपयांच्या पाकिटात एक किलो रवा, खाद्यतेल, साखर आणि चणा डाळ असेल. अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने हा प्रस्ताव आणला आहे. याकरता 513 कोटी 24 लाख रुपये इतका खर्च येत आहे.
मंत्रिमंडळाच्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात 1.70 कोटी कुटुंबे किंवा सात कोटी लोकांकडे रेशन कार्ड सुविधा आहे. ते सरकारी रेशन दुकानातून धान्य खरेदी करायला पात्र आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ग्राहक किंमत निर्देशांकानुसार देशाचा किरकोळ महागाई दर सात टक्के आहे. हे पाहता राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किराणा मालाचे पॅकेज देऊन दिवाळीसाठी फराळ आणि मिठाई बनवायला मदतच करेल.
महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर्ससाठीही रेशनकार्ड
आपण समाजात तृतीयपंथी लोक पाहतो ते लोकांकडून पैसे गोळा करूनच आपली दिवाळी साजरी करतात. तृतीयपंथी म्हणजे ट्रान्सजेंडर्सच्या बाजूने निर्णय घेऊन राज्याने त्यांच्यासाठी रेशनकार्ड देण्याची सगळी प्रक्रिया सोपी केली आहे. सरकारने अधिसूचना जाहीर करत तृतीय लिंग समुदायातील कोणतीही व्यक्ती ज्यांची नावे राज्य एड्स नियंत्रण समितीकडे नोंदणीकृत आहेत ते रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात. त्यांना रहिवासी दाखला किंवा ओळखीचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. तसेच, त्यांच्याकडे वोटिंग कार्ड असल्यास आणि त्यामध्ये ते तृतीय लिंग असल्याचं लिहिलं असेल तर ते ओळखपत्र वापरुन रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात.
रेशन कार्ड प्रत्येक नागरिकासाठी
खरं तर, कोविड-19 आला आणि लोकांचं जगणं मुश्किल झालं. कोरोना काळात लॉकडाऊन असताना जेव्हा काम नव्हतं आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाले, तेव्हा ट्रान्सजेंडर समाजातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. त्याचवेळी शिधापत्रिका नसल्यामुळे त्यांना शासनाच्या गरीब कल्याण योजनेचा लाभ घेता आला नाही, ज्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत धान्य वाटप केले जात होतं. त्यावेळी महाराष्ट्रातील सुमारे 50 टक्के ट्रान्सजेंडरकडे रेशन कार्ड नसल्याचं समोर आलं होतं. मात्र आता यंदाच्या दिवाळीत अशा उपेक्षित वर्गाला सुद्धा सरकारकडून दिवाळीचा बोनसच मिळणार आहे.