बारावीच्या परीक्षेचा निकाल 21 मे रोजी लागणार | Maharashtra HSC 12 th result 2024 |
मे महिना सुरू झाला की सर्वांना वेड लागतात की , फिरायला कुठ जायचं काय काय करायचं..पण यामध्ये तरुणाईच्या मनात थोडी थोडी धाकधूक चालू असते.. तुमच्या डोळ्यासमोर पण तेच आल ना..हो ते म्हणजे बारावीचा निकाल.. दहावी नंतर बारावी हा सर्व मुला- मुलींच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. या निकालानंतर त्यांचं भवितव्य ठरत असत. ज्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे. तो त्या क्षेत्रात जात असतो. काही मुलामुलींनी ठरवून ठेवलेलं असत की काय करायचं कुठ ऍडमिशन घ्यायचं तर काहींनी लक्ष फक्त निकालाकडे असत. निकाल आल्यावर बघू असे त्यांचं मत असत आणि याच निकालाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आत्ताच समोर आलेल्या माहितीनुसार उद्या 21 मे रोजी दुपारी आपल्याला हा निकाल पाहता येणार आहे. आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहे की प्रत्येक वर्षी बारावीच्या परीक्षेत मुलीच बाजी मारत आहेत यावर्षीचा निकाल काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
गेल्या महिन्यापासून बारावीच्या निकालाबाबत खूप अफवा उटल्या जात होत्या. गुगल आणि chrome वर देखील त्याच्या निश्चित तारखा दिसत नव्हत्या त्यामुळं बारावीच्या मुला मुलींना या गोष्टीचे खूप टेन्शन आलं होतं. लाखो विद्यार्थ्यांनी बारावीची ही परीक्षा मार्च महिन्यात दिली आहे तर तुमची हीच प्रतीक्षा अखेर उद्या संपणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर तुम्ही हा निकाल पाहू शकता. तुमचा जो काही क्रमांक आहे तो या वेबसाईटवर टाकून तुमच्या आईचे नाव टाकून तुम्ही हा रिझल्ट पाहू शकता.
बारावीच्या मुलांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. निकालानंतर तुमचे जे काही केंद्र किंवा तुमचे कॉलेज आहेत तिथे तुम्हाला काही कालावधीनंतर या निकालाची सर्टिफिकेट देखील मिळतील. या निकालानंतर जो काही पुढचा टप्पा विद्यार्थ्यांना गाठायचा आहे. उद्या नंतर ते गाठू शकतात. अतिशय महत्त्वाचा अशा उद्याच्या या निकालाची उत्सुकता जिल्हासह राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना लागली आहे.
*कुठे व कसा पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल :*
1. mahresult.nic.in
2. http://hscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in
निकाल पाहण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या:
* बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
* बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
* तुमचा सीट नंबर आणि जन्मतारीख आईचे नाव आणि आवश्यक माहिती भरा.
* बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्हाला काही वेगळे सांगायला नको की राज्यातील मुला-मुलींना आज कळले आहे की उद्या बारावीचा निकाल आहे तर त्यांच्या मनाची अवस्था काय असेल हे आपण सर्व जण समजू शकतो. कारण प्रत्येक जण दहावी बारावीच्या या स्टेप मधून गेलेलाच आहे. त्यामुळे मुलांनो आपण सर्वांनी वर्षभर जे काही कष्ट घेतले आहेत त्याचे एक प्रकारे फळ आपल्याला उद्या मिळणार आहे. निकाल काही असो तुम्ही संयमाने आम्ही सामर्थ्याने याला सामोरे गेले पाहिजे. कारण काही मुले घाबरून निकाल येण्याआधीच काहीतरी कृते करून बसतात. त्यामुळे बारावीची परीक्षा परत देता येते पण आपला आयुष्य परत नाही येणार म्हणूनच पालकांनी देखील आपल्या मुलांना आयुष्याच्या या टप्प्यावर साथ दिली पाहिजे. संपूर्ण राज्याचा किती टक्के निकाल लागला आहे हे उद्या आपल्याला दुपारनंतर कळेलच.