मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात मोठे बदल | Ladaki Bahin Yojana New Updates 2024 |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात मोठे बदल | Ladaki Bahin Yojana New Updates 2024 |

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ची घोषणा १ जुलै २०२४ रोजी पासून सुरू केली गेली आहे. या योजनेसाठी महिलांनी तहसील कार्यालयासमोर मोठी झुंबड उडविली आहे. तरीही हा अर्ज भरण्यासाठी महिलांना योग्य मार्गदर्शन व कागदपत्रांची जमवाजमव करण्यास धावपळ होत असल्याने या योजनेबाबत महिलांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. या योजनेसाठी अजूनही कोणतीही ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही.

या योजनेची घोषणा झाल्या नंतर गरजू आणि गरीब महिलांनी तहसील कार्यालयासमोर एकच गर्दी केली आहे. पण या योजनेतील निकषांबाबत थोडी शंका असल्याने त्यातील कागदपत्रे जमविणे ह्या गरजू महिलांना थोडे जडच जात आहे. त्यातील योजनेस पात्र होण्यासाठी महाराष्ट्राचे अधिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक आहे. पण ज्यांच्याकडे हे अधिवासी प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठी काही नियम शिथिल केलेले आहेत.
त्यामुळे महिलांच्या मनातील शंका निर्मूलनासाठी सरकारने त्या योजनेत आणखी बदल केलेले आहेत ते काय बदल केलेले आहेत याची सविस्तर माहिती आपण घेऊ.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील आणि ज्यांची निवड या योजनेत होईल त्या महिलाना महिना १५०० रूपए त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (योजनेत मोठे बदल):-

आपण आता यातील कोणते बदल केले आहेत त्यामुळे या महिलांना काय करावे लागेल याची सविस्तर माहिती घेऊ.

१. योजनेतील सर्वात मोठा बदल म्हणजे या योजनेची मुदत वाढवलेली आहे. आजपर्यंत १५ जुलै पर्यन्त असणारी मुदत ही ३१ ऑगस्ट पर्यन्त करण्यात आली आहे.

२. जरी याची मुदत वाढविली असली तरीही अर्ज करण्यात आलेल्या महिलांना १ जुलै पासूनच दर महिना १५०० रूपए इतका आर्थिक लाभ देण्यात येईल. असे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बदल केले गेले आहेत.

३. या योजनेत पात्र होण्यासाठी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले होते. परंतु अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्या ऐवजी

• १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड,

👉🏻 ऑनलाइनअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

• मतदान ओळखपत्र

• शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

• जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

४. या योजनेतील ५ एकर शेतीची जी अट नमूद केली होती ती आता वगळण्यात आलेली आहे.

५. या योजनेतील पूर्वीची वयाची अट ही २१ ते ६० वयवर्षे असणार्‍या महिलाच अर्ज करू शकत होत्या त्या ऐवजी आता २१ ते ६५ वर्षे वयोगटा पर्यन्तच्या महिला या योजनेत अर्ज करू शकतात.

६. या योजनेत आणखी एक खूप महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या महिलांचा जन्म परराज्यात झालेला आहे पण त्यांनी महाराष्ट्र राज्यातील अधिवास असणार्‍या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

७. ज्या अर्जदार महिलांकडे अडीच लाख रूपए पर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला नसेल परंतु त्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल तर त्या अर्जदार महिलेला उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट दिली जाणार आहे.

८. या योजनेत एखाद्या कुटुंबातील अविवाहित महिला सुद्धा अर्ज करू शकते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील खालील निकषा आधारे अपात्र महिला अर्जदार

१. अर्जदार महिलेने या आधी राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या कोणत्याही योजनेद्वारे दीड हजार पेक्षा अधिक रक्कमेचा लाभ घेतलेला असेल तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

२. अर्जदार महिला जर करप्राप्त असतील तर त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील.

३. ज्या महिलांच्या कुटुंबातील कुणी सरकारी नोकर असेल तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.

४. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य जर सरकारी निवृत्ती वेतन धारक असतील तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.

५. कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील. (पण याला अपवाद असा आहे की जर चारचाकी शेतीसाठी असेला ट्रॅक्टर असेल तर तो चालू शकतो.)
काही महिला ह्या अशिक्षित आहेत त्यांना तो अर्ज भरून घेण्यासाठी शिक्षित माणसाची आवश्यकता आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात दलाल अव्वाच्या सव्वा पैसे आकारून त्या गरजू महिलांना तो फॉर्म भरून देत आहेत.

 

👉🏻 ऑनलाइनअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *