महाराष्ट्र होमगार्ड पदाच्या भरती |Maharashtra Recruitment 2024 |
महाराष्ट्र होमगार्ड संघटना अंतर्गत होमगार्ड पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. एकूण ९७०० जागांसाठी ही भरती होणार असून एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात १५ जुलै २०२४ पासून सुरू आहे पण प्रत्येक जिल्हयासाठी वेगवेगळ्या तारखा आहेत. आपण अधिकृत नोंदणी (https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php) स्थळावर पाहू शकता. गृहरक्षक दल अधिक सक्षम करणायसाठी राज्यात रिक्त असलेल्या जवानाच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आलेला आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. (https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php)
होमगार्ड संघटनेचा उद्देश( Objective of Home Guard Organization):-
देशातील नागरिकांना सैनिक तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. होमगार्ड हे सहाय्यकारी दल असून पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणेकरिता सहाय्य करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे.
मोबाईल वरून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
होमगार्ड सदस्यांना देय भत्ते (Allowances Payable to Home Guard Members) :
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रुपये ५७०/- कर्तव्य भत्ता व रूपए १००/- उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात ३५/- रूपए खिसा भत्ता व १००/- रूपए उपहार भत्ता दिला जातो तसेच साप्ताहिक कवायतीसाठी ९० रूपए कवायत भत्ता दिला जातो.
होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे (Benefits of Home Guard Membership):-
• सैनिकी गणवेश परिधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण.
• तीन वर्षे सेवा पूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण.
• प्रथमेपचार, अग्निशमन, विमोचन, यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
• गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदके मिळविण्याची संधी.
• स्वतःच व्यवसाय व शेती सांभाळत देशसेवा करण्याची संधी.
होमगार्ड नोंदणी नियम व अटी :-
होमगार्ड पात्रतेचे निकष:-
1. पदाचे नाव – होमगार्ड जवान हे असे पदाचे नाव असणार आहे.
2. शैक्षणिक पात्रता – कमीत कमी दहावी उत्तीर्ण.
3. शारीरिक पात्रता – वय 20 पूर्ण ते 50 वर्षेच्या आत
4. ऊंची – पुरुषांकरिता 162 से.मी. महिलांकरिता 150 से. मी.
मोबाईल वरून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
5. छाती – फक्त पुरुषांकरिता न फुगविता 76 से.मी. कमीत कमी 5 से. मी. फुगविणे आवश्यक
6. एकूण पदे – ९७०० एवढी महाभरती पदांसाठी ही संख्या असणार आहे.
7. भरती प्रकार – महाराष्ट्र होमगार्ड विभागाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
8. निवड प्रक्रिया – यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता व मैदानी चाचणी घेतली जाणार आहे व कागदपत्रे देखील पाहिले जाणार आहेत.
9. नोकरीचे ठिकाण – नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण स्वतःचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये असणार आहे.
होमगार्ड नोंदणीसाठी (Homegaurd Recruitment) आवश्यक कागदपत्रे:
• अर्जदारला रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड व मतदान ओळखपत्र आवश्यक आहे.
• शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
• जन्मदिनांक पुरवयाकरिता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला
• तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
• खाजगी नोकरी करीत असल्यास त्या मालकाचे न हरकत प्रमाणपत्र
• तीन महिन्याचे आतील पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
होमगार्ड पदाच्या भरती (Homegaurd Recruitment) नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना:-
१. होमगार्ड पदासाठी जे अर्ज भरवयाचे असतील ते विहित नमुन्यातील अर्ज हे इंग्रजीतू भरायचे आहेत. एका अर्जदाराला त्याच्या आधारकार्डच्या आधारे एकच अर्ज भरता येईल.
२. होम गार्ड पदासाठी अर्जदारने तो ज्या भागातील रहिवासी आहे आणि तो भाग ज्या पोलिस ठाणेच्या अंतर्गत येतो, त्याच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत, त्याच जिल्हयातून अर्ज करावयाचा आहे.
३. अर्ज सबमिट झाल्यावर त्याची एक प्रिंट काढून त्यावर आपले सध्याचे छायाचित्र चिक्त्वायचे आहे. मराठीमधील माहिती ही अर्जदारने पेनने लिहावयाची आहे.
४. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत जी संकेत स्थळावर दिलेली आहे ती बघून त्यानुसार चेक अकरून घ्यावी. अर्ज क्रमांकानुसार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पासून कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी पोलीस मुख्यालयात होईल.
५. अर्जदारने जी कागदपत्रे अपलोड केली आहेत ती त्या दिवशी स्वतः बरोबर घेऊन यायची आहेत.
६. पत्र उमेदवारांची निवड ही त्या पोलीस ठाणे अंतर्गत रिक्त जागांनुसार केली जाईल.
७. अर्जदारांनी चाचणीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
८. यापूर्वी होमगार्ड सेवेतून अकार्यक्षम किना बेशिस्त ठरलेल्या उमेदवाराने पुन्हा अर्ज करू नये.असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.