अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येतील?
आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान पावसामुळे पूरस्थिती उद्भवली. ह्या पुरात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मिळणार? महिन्यात कोणत्या महिन्यात किती तारखेला मिळणार? कुणा कुणाला मिळणार? त्याची सगळी माहिती या लेखातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
शेतकऱ्यांनी येत्या पावसात भरपूर प्रमाणात नुकसान सोसले आहे त्यामुळे त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे राज्य सरकारने यासाठीच शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे म्हणूनच ही बातमी शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
हे सरकार शेतकऱ्यांचा आणि कष्टकरी जनतेचे सरकार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी 8 सप्टेंबर 2022 रोजी तीन हजार चारशे छप्पन कोटी म्हणून मंजूर केली आहे.
यासंदर्भात शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे. या शासन निर्णयानुसार जिरायत भागासाठी किंवा जिरायत पिकासाठी 13600 रुपये मदत दिली जाणार आहे.
त्यानंतर शासन निर्णयानुसार बागायत शेतीसाठी नुकसान भरपाई म्हणून 27 हजार रुपये दिले जाणार आहेत
त्यानंतर या शासन निर्णयानुसार बहुवार्षिक पिकासाठी 36 हजार रुपये मदत म्हणून शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत.
पूर्वी नुकसान भरपाई म्हणून जी मदत मिळत होती ती दोन हेक्टर पर्यंत मर्यादित होती आता ती तीन हेक्टर शेतीच्या भागाला मिळणार आहे. मात्र गरीब शेतकरी या चिंतेत आहेत की अतिवृष्टी नुकसान भरपाई हे आमच्या खात्यात कधी जमा होणार आहे? शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
ही माहिती सरकारी जीआर नुसार असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नक्की जमा केली जाईल.
तर फक्त विभागनिहाय नुकसान भरपाई निधी मंजूर झाला आहे
आता आपण बघूया की अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरता विभाग वार किती निधी वाटपासाठी मिळालेला आहे.
विभागनिहाय निधी
कोकण विभाग 2.64 कोटी
पुणे विभागाकरिता 44 कोटी 38 लाख रुपये
नागपूर विभागाकरिता 1156 कोटी
औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी
अमरावती विभागाकरिता 1196 कोटी तर
नाशिक विभागाकरिता 36 कोटी 95 लाख रुपये
त्याच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकतात की, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे? त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यातील एकूण हेक्टरचं झालेलं नुकसान आणि तुमच्या जिल्ह्याला मिळणारा नुकसान भरपाईचा निधी तुम्ही पाहू शकता.
अतिवृष्टी नुकसान भरपाई करताना शासनाने ह्या अटी ठेवल्या आहेत.
तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत पात्र राहील. ही मदत देताना दोनदा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याप्रमाणे, शेतजमिनीतील गाळ, डोंगराळ शेतजमिनीवरील मातीचा ढिगारा (मलबा) काढणे, मत्स्य शेती दुरुस्ती करणे, मातीचा थर काढणे, पुवर्वत करणे आणि दरड कोसळणे, जमिन खरडणे, खचणे व नदी पात्र/ प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यामुळे शेतजमीन व इतर नुकसानीसाठी दिली जाणारी मदत केवळ २ हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार असून या लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही शासकीय योजनेखाली मदत अथवा अर्थसहाय्य किंवा अनुदान घेतलेल नसावं.