सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी का झाला नाही? कुस्तीचा थरारक अनुभव वाचा.Sikandar Sheikh kushti 2023
मित्रांनो, नुकताच महाराष्ट्र केसरीचा चित्त थरारक अनुभव आपण घेतला असेल.
हया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख कसा
हरला ह्याचीच चर्चा सुरू होती. ह्या आधी महेंद्रला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावं लागलं होतं. सेमी फायनलमध्ये महेंद्रने उत्तर भारतात आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या सिकंदर शेखचा पराभव केला होता. सिकंदर शेख हा यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जात होता. फक्त त्याच्या नावाची घोषणा बाकी होती.
सिकंदर शेख जेवढा प्रसिद्ध आहे त्या मानाने महेंद्र तसा सर्वांसाठी नवखा पैलवान होता. ह्या नव्या पठ्ठ्याने एका डाव असा टाकला की विजय त्याचा झाला. पण काही लोक हे खरं मानत नाही आहेत.
ह्या आधी महाराष्ट्र केसरी चा इतिहास असं सांगतो की, महाराष्ट्रातील मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराज राक्षेने फायनलमध्ये महेंद्र गायकवाडला चीत करत पराभवाची धूळ चारली. त्याच महेंद्रला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावं लागलं. सेमी फायनलमध्ये महेंद्रने उत्तर भारतात आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या सोलापूरच्या सिकंदर शेखचा पराभव केला होता. पण तज्ञ लोकांच्या मते सिकंदर शेख यंदा महाराष्ट्र केसरी व्हायला हवा होता. सिकंदरच्या प्रसिद्धीच्या मानाने महेंद्र तसा सर्वांसाठी नवखा पैलवान होता. एक डाव खेळून विजय पक्का झाला.
झालं असं, की माती विभागातील पहिली सेमी फायनल महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात होणार होती. सर्व मैदान खचाखच प्रेक्षकांनी भरलं होतं, पहिल्याच कुस्तीला अखिल भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांसह इ. मान्यवर उपस्थित होते.
झालं मैदान प्रेक्षकांनी सजलेलं, संबळ वाजलं, बजरंग बली आणि छत्रपती शिवाजी महाराज नावांचा जयघोषात कुस्तीला सुरूवात झाली. हजारोंच्या संख्येने आलेलं पब्लिक शांत बसलं होतं. कुस्तीला सुरूवात झाली, महेंद्र गायकवाडला पहिला गुण मिळाला, पहिली फेरी संपायला 10 सेकंद बाकी असताना सिकंदरने दोन गुणांची कमाई केली. पहिल्याफेरीअखेर सिकंदर 2 गुण आणि महेंद्र गायकवाड 1 गुण असा सामना रंगला.
दोन्ही पहिलवान एकमेकांना गुण मिळवून देण्याची संधी देत नव्हते. कुस्ती रंग आणत होती, निवेदकांनीही आपल्या बहारदार पैलवानी कॉमेट्रीने वातावरण तयार खेचून आणलेलं.
दुसरी फेरी चालू झाली, हया वेळी सिकंदरने आक्रमक पवित्रा घेतला आणि महेंद्रला बाहेर ढकलत आणखी एक गुण पटकावला. दोघेही आपली वर्षेभर केलेली मातीतली मेहनत पणाला लावत होते. मातीत कसलेले दोघे गडी होते. डाव प्रतिडाव झाले तितक्यात चलाखीने महेंद्रने बाहेरची टांग डावच टाकत भरघोस 4 गुणांची कमाई केली. त्यावेळी सिकंदरच्या मार्गदर्शकांकडून चॅलेंज घेण्यात आलं. इथेच लोकांचं लक्ष लागलं.
पंचांनी झालेला डाव पाहत महेंद्रला 4 आणि सिकंदरला 1 गुण दिला. आता पॉईंट झाले सिकंदर 4 आणि महेंद्र 5 त्यावेळी कुस्तीची 2 मिनिट बाकी होती. महेंद्र आक्रमक होत त्याने सिकंदरला शेवटची झुंज दिली आणि अखेरपर्यंत गुण घेऊन दिला नाहीच. शेवटी डाव संपला आणि 6-4 ने सिकंदरचा पराभव झाला. महेंद्र विजयी झाला. महाराष्ट्र केसरी झाला. पण माध्यमांची वेगळीच चर्चा चालू आहे. काहींच्या मते सिकंदर हरवला गेला.
खरं खोटं ह्याची शहानिशा जबाबदार लोक करतीलच.
पण अखेर सिकंदर शेख पराभूत झाल्याने कुस्ती चाहत्यांनाही सिकंदरला महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा उंचावताना पाहणं स्वप्नच राहीलं. महाराष्ट्र केसरीकरता प्रबळ दावेदार मानला जाणारा सिकंदर महेंद्र गायकवाडकडून थोड्याच गुणांनी पराभूत झाल्याने चाहते नाराज झाले.
पण मित्रांनो, इतिहासात ह्याच सिकंदरने बाला रफिक शेख ह्या मल्लाला अवघ्या 40 सेकंदात आस्मान दाखवलं होतं.
पण ह्यावेळी बाजी पालटली गेली.
कोण आहे हा सिकंदर शेख?
सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. काळया मातीतला गडी. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्र्य पाचवीला पुजलेलं..घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. निमगावच्या मगराच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचा. असं सुरू असतानाच प्रकृती खालावली म्हणून रशीद घरी परतले आणि लगीनगाठ बांधली गेली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत कायमचीच झाली. मात्र तेंव्हाही कुस्ती सोबतीला होती. पुन्हा कुस्ती लढायला त्यांनी सुरवात केली. इथेच स्वप्न रुजली आणि प्रवास सुरु झाला.
हमाली ते कुस्ती असा प्रवास
ओझी वाहणारे हमाल वडील घरात पैशाची चणचण. पण कुस्तीचा प्रवास करत करत एका हमालाच्या पोराने महान भारत केसरी सारख्या मानाच्या किताबाला गवसणी घातली होती. जगाची हमाली पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे पांग फेडले ते मल्ल सिकंदर शेख ह्यांनी. कर्नाटकात झालेल्या कुस्ती स्पर्धेत उत्तरेच्या हिंदकेसरी तगड्या अनुभवी मल्लांना लढत देत मोठ्या खुबीने हा किताब त्याने आपल्या हातात धरला.
हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात वडिल कुस्ती खेळायचे आणि अशा कुस्तीत जिंकलेल्या इनामावर शेख कुटुंबियांचे दिवस जात होते. त्यात अल्लाच्या कृपेने हुसेन आणि सिंकदर ही दोन मुलं पदरी आली. आणि मग मात्र मिळणाऱ्या बक्षीसांच्या रकमेवर चार लोकांचं पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न पडला.
शेवटी वडिलांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायची, घाम गाळायचा पण कुस्तीचा आखाडा आठवून ते अस्वस्थ व्हायचे. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. मुलं मोठी होऊन कुस्तीगीर व्हावीत हेच स्वप्न त्यांनी ह्या मातीत पाहिलं.
सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही लाभलं.
घरातच पहिलवानकी
घरात सिकंदर, भाऊ हुसेन आणि वडील असे तीन पहिलवान. शक्ति होती पण पोट भरायला साधन म्हणजे हमाली.
पुढे जाऊन भावाने वडिलांच्या हमालीचे ओझे घेतले पाठीवर घेतलं. सिंकदर अलीकडे चांगल्या कुस्त्या मारू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. त्यात सिंकदरच्या वडिलांना आजाराने गाठले आणि त्यांची हमाली थांबली. आता कुस्तीच्या खुराकाला लागणाऱ्या पैशांची चणचण जाणवू लागली.
ही परीक्षेची वेळ येताच मोठा भाऊ हुसेनने आपली कुस्ती थांबवत वडीलाच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर उचललं.
मात्र धाकटा सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकु लागला. गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून पैशाचं पाठबळ मिळत होतं. ह्या तूनच सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या बाविसाव्या वर्षात अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने आजमावली.
ह्याच मेहनतीने आपल्या कुशल खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कुस्तीगीरात आपला मान मिळवून आहे.
वडीलांच्या स्वप्नासाठी जगतोय
आपल्या वडीलांच्या, भावाच्या पाठीवर असलेले हमालीचं ओझं कमी व्हावं घरातलं दारिद्रय जावं, सुखाचे दिवस यावेत यासाठी मेहनत करणारा सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. भाऊ हुसेननेही आपली कुस्ती पुन्हा सुरू केली आहे. वडीलांच्या कष्टाची उतराई करत आता दोघेही वडिलांचं अपूर्ण राहिलेलं पैलवानकीचं स्वप्न पूर्ण करतकुस्तीची मैदानं गाजवत आहेत.